- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : मनपाद्वारे नागपूरकरांना नवीन वर्षाची भेट; मालमत्ता कर अभय योजना २०२४-२५

नागपूर समाचार :नतेला नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नवीन वर्षाची अनोखी भेट देण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर थकबाकीदाराकडून थकीत मालमत्ता कर रक्कमेवर लागणारी शास्ती / दंड ८०% माफ करण्याची महत्वाकांक्षी “मालमत्ता कर अभय योजना २०२४-२०२५ सुरू करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.

नागपूर शहरातील ज्या मालमत्ताधारकांद्वारे विहित कालावधीत मालमत्ता कराचा भरणा केले जात नसल्याने, संबंधीत मालमत्तेच्या थकीत मालमत्ताकरावर २% प्रति माह प्रमाणे शास्ती / दंड लागत असून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अशा २८६३९९ मालमत्ताधारकांवर ८५० कोटी १० लाख ७३ हजार रुपये मालमत्ता कर बकाया आहे. यावर ७७० कोटी ४५ लाख २८ हजार रुपये व्याज लागलेली आहे. यामध्ये, शासकीय/निमशासकीय मालमत्ता करीता सुद्धा मालमत्ता कर रक्कम ३०.७३ कोटी रुपये थकीत आहे तसेच विवादीत प्रकरणामुळे सुद्धा रक्कम २२७.०० कोटी रुपये थकीत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे परिशिष्ट ‘ड’ प्रकरण-८ चे कराधान नियम ४२ अन्वये मालमत्ता कर भरण्यास पात्र व्यक्तीने या अधिनियमाच्या तरतूदीन्वये आवश्यक आहे. त्याप्रमाणे शास्ती किंवा व्याज अथवा दोन्ही यासह मालमत्ता कर भरला नसेल तर कसूरदाराची जंगम मालमत्ता / स्थावर मालमत्ता अटकावणी किंवा जप्ती करण्यात येवून याकरीता नियम ५० अन्वये लागू केलेली फी किंवा वसुलीचा खर्च म्हणून संबंधीत मालमत्ताधारकांकडून वसुल करण्यात येते.

शास्तीची रक्कम माफ करण्याबाबत वेळोवेळी प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने तसेच बकाया रक्कमेची वसुली अधिक प्रमाणात करता येईल या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली आहे. ही योजना राबविल्यास ३१ मार्च २०२४ पर्यंत थकबाकीची रक्कम यावरील, २० टक्के शास्ती/दंड रक्कमेसह चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ चा मालमत्ता कर नागपूर महानगरपालिका निधीत जमा करणे आवश्यकआहे. मुळ बकाया आणि २० टक्के शास्ती/दंड रंक्कम यासह जवळपास २०० कोटी ची वसुली मनपाला अपेक्षित आहे. ज्या मालमत्ताधारकांनी या योजनेचा दिलेल्या कालावधीत लाभ घेतला नाही किंवा सामील होण्यास तयार नसतील त्यांचे विरूध्द या कालावधीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कराधान नियम अंतर्गत असलेल्या तरतुदीच्या अधिन राहून कार्यवाही करण्यात येईल. सदर योजना ही वर नमूद केलेल्या कालावधीत जमा केलेल्या रक्कमांनाच लागू राहील. या योजनेच्या प्रारंभापूर्वी अथवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या रक्कमांना लागू राहणार नाही. योजना सुरु होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी या योजने अंतर्गत मागणी/दावा करता येणार नाही, असेही मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *