- Breaking News, राजनीति, विदर्भ

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सिंधी रेल्वे या शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते राजुभाऊ तळवेकर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

■ आमदार समीर भाऊ कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला

हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

काल दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सिंधी रेल्वे या शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) चे नेते राजुभाऊ तळवेकर यांनी आ. समीर कुणावार यांचे विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास व काम करण्याची कार्यशैली पहाता भाजपा चे माजी जिल्हा उपाध्यक्ष राजू गंधारे यांच्या नेतृत्वात आमदार समिर कुणावार यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 

सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन काल दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले.

उपरोक्त कार्यक्रम आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाला आमदार समीरभाऊ कुणावार यांचे सह भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, माजी जिल्हा उपाध्यक्ष राजू गंधारे व अमोल सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते…. श्री. राजेशजी तळवेकर यांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादी ला मोठ्या प्रमाणात धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *