सिरोंचा समाचार : मा.खा.तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अशोकजी नेते यांनी आज दिनांक ०२ जानेवारी २०२५ रोजी सिरोंच्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते सत्यनारायणजी मंचरलावार व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दामोदरजी एरिगेला यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी मंचरलावार व एरिगेला यांच्या कुटुंबाशी संवाद साधून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जेष्ठ नेते सत्यनारायणजी मंचालवार, जिल्हा उपाध्यक्ष दामोदरजी एरिगेला, माधव कासरलावार, अमित त्रिपाठी, प्रकाश एरोला, श्रीधर आनकरी, तुषार एंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.