- Breaking News, PRESS CONFERENCE

अहेरी समाचार : अहेरी विधानसभेत भाजप विशेष सदस्यता नोंदणी मोहीम – मा. खा. अशोक नेते यांची पत्रकार परिषदेत माहिती

अहेरी समाचार : अहेरी विधानसभेत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विशेष सदस्यता नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा आणि अहेरी येथे या मोहिमेचा यशस्वी प्रचार व प्रसार करण्यात आला. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि अहेरी विधानसभा क्षेत्राचे सदस्य नोंदणी प्रभारी मा. खा. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात या मोहिमेला जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळाला.

देशभरात भाजपने ०१ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत विशेष सदस्यता नोंदणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अहेरी विधानसभेत आज ५ जानेवारी रोजी विशेष सदस्यता नोंदणी कार्यक्रम पार पडला.

शासकीय विश्रामगृह आलापल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत मा. खा. अशोक नेते यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती दिली.

सदस्यता नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत मा.खा.:नेते यांनी देत म्हणाले भाजपच्या सदस्यत्वासाठी नागरिकांना ८८००००२०२४ या क्रमांकावर मिस कॉल देऊन नोंदणी करता येते. मिस कॉल दिल्यानंतर आलेल्या संदेशातील लिंकवर आपली संपूर्ण माहिती भरून सदस्यता नोंदविता येते. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही, तिथे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून सदस्यता नोंदणी केली जात आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ही मोहीम व्यापक स्वरूपात यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत, असे नेते यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून, अधिकाधिक नागरिकांना पक्षाशी जोडणे हे सदस्यता नोंदणी मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. डिजिटल व ऑफलाइन पद्धतींचा वापर करून विविध स्तरांवरील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे.

या पत्रकार परिषदेला प्रमुख मान्यवर ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष बाबूरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, मच्छिमार सेल अध्यक्ष मोहन मदने, जिल्हा सचिव पोशालू चौधरी, तालुका महामंत्री सुकमल हलदार, अशोकजी आत्राम, अभिजीत शेंडे, अंकुश शेंडे, हर्षीत वर्मा आणि सागर बांबोळे यांची उपस्थिती होती.

विशेष सदस्यता नोंदणी मोहिम

भाजपच्या या उपक्रमाने न केवल सदस्यसंख्या वाढवली आहे, तर लोकांपर्यंत पक्षाचे विचार, धोरणे आणि उद्दिष्टे पोहोचवण्याचे महत्त्वाचे कामही केले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहता, ही मोहीम भविष्यातील कार्यासाठी एक आदर्श उदाहरण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *