माजी विद्यार्थ्यांनी केला शिक्षकांचा सत्कार व वृक्षारोपण
हिंगणघाट समाचार : तालुक्यातील बुरकोणी येथील श्री संत साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९९६ साली दहावीत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मिलनाचा आगळावेगळा कार्यक्रम काल दि.१० जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या स्नेह मिलन सोहळ्याचे निमित्ताने प्राचार्य हेमंत तिमांडे सर व प्रा.मधूकर ढगे सर यांचा हृद्य सत्कार सुद्धा करण्यात आला.
थेट २८ वर्षानंतर स्नेह मिलनाचे निमित्ताने हे जुने मित्र तथा बाल सवंगडी एकत्र आले, या आनंद सोहळ्यासोबतच आपले निसर्गाशी काही देणे लागते याचे भान ठेवून या मित्र-मैत्रिणींनी वृक्षारोपणही केले.
सदर कार्यक्रमाला श्री. संत साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा. हेमंत तिमांडे सर, मा. प्रा. मधुकर ढगे सर , मा. प्रविण नाईक सर इत्यादी मान्यवरांसह शालेय शिक्षकवृंद उपस्थित होते .
उपरोक्त कार्यक्रमाचे संचालन माजी विद्यार्थी रविकांत डोळसकर यांनी केले तर नरेंद्र वनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या स्नेहमिलन कार्यक्रमाला १९९६ बॅचचे एकूण ४२ माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
यात रविकांत डोळसकर , नरेंद्र वनकर, नागेश भोंग, महेंद्र शास्त्रकार, मारुती मंगेकर, अमोल नागपूरे, हेटी सावंगी येथील सरपंच किशोर गुडधे, नेपालचंद्र तुराळे, गणेश भोंग, ज्योती लोणकर ( चकोले ), ज्योती डोफे, पद्मा ताकसांडे, सारिका थुल, अर्चना पांगुळ, विशाखा थुल इत्यादीसह शालेय शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.