गडचिरोली समाचार : मौजा काटली येथे “का रक्त पिता गरीबाचे” या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांनी प्रमुख उपस्थिती पार पडला त्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना नाटकाचा रसस्वाद घेताना उद्बोधनाचा चांगला लाभ घेण्याचे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची आणि एकत्र येण्याची संधी मिळते, असे त्यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले.
या सोहळ्यात मंचावर जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ज्येष्ठ नेते गजाननजी येनगंदलवार, जिल्हा उपाध्यक्ष रत्नदीप पाटील म्हशाखेत्री, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, ज्येष्ठ नेते वामरावजी ठाकरे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सांगता प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने झाली. या नाटकाने सामाजिक असमानता आणि गरीब जनतेच्या समस्यांना प्रकाशझोत आणत समाजाला विचार करण्यास प्रवृत्त केले.