- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर समाचार

नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विविध स्पर्धांना भेट

■ कबड्डी, सॉफ्टबॉल, खो-खो च्या ट्रॉफीचे केले अनावरण

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता.१४) विविध स्पर्धांना भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले. ना. नितीन गडकरी यांनी विभागीय क्रीडा संकुल मानकापुर येथे भेट देऊन सिंथेटिक ट्रॅकवर सुरु असलेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेचा आनंद घेतला. त्यांनी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदान करुन शुभेच्छा देखील दिल्या.

यानंतर ना. गडकरी यांनी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु असलेल्या कबड्डी स्पर्धेला सुद्धा भेट दिली. खेळाडूंशी हस्तांदोलन करुन त्यांना स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी स्पर्धेतील विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचे अनावरण केले.

याशिवाय सॉफ्टबॉल आणि खो-खो स्पर्धेला देखील ना. नितीन गडकरी यांनी भेट दिली व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांनी सॉफ्टबॉल खेळण्याचा आनंद देखील घेतला. ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते दोन्ही स्पर्धांच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, डॉ. विवेक अवसरे, डॉ. पद्माकर चारमोडे, अशफाक शेख, सतीश वडे, सॉफ्टबॉल संघटनेचे सुरजसिंग येवतीकर, प्रवीण मानवटकर, अनिल जोशी, अमर खोंडे, केतन ठाकरे, विनय कडू आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *