- Breaking News, धार्मिक , विदर्भ

गढ़चिरौली समाचार : श्रीमद् भागवत सप्ताह आणि श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानदान यज्ञ उत्साहात

■ “आध्यात्मिक कार्यक्रमाची गरज – मा. खा. अशोकजी नेते यांचे प्रतिपादन”

गढ़चिरौली समाचार : श्रीमद् भागवत सप्ताह व श्रीग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानदान यज्ञाचे आयोजन मौजा- कान्होली, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे वारकरी संप्रदाय तथा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले. पं. पूज्य धनराज महाराज नागापुरे यांच्या प्रवचनातून हे भागवत सप्ताहाचे आयोजन सध्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे.

या भागवत कार्यक्रमाच्या प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,

“आध्यात्मिक कार्यक्रमांद्वारे संस्कार, आचार आणि विचारांची निर्मिती होते. आजच्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे. या कार्यक्रमांमुळे समाजातील धार्मिक व सामाजिक सुधारणा घडून येतील. अशा आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करून समाजात सकारात्मक बदल घडवणे गरजेचे आहे.”

जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम यांनीही आपले विचार मांडताना आध्यात्मिकतेच्या महत्त्वावर भर दिला.

कार्यक्रमास सहकार आघाडी प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे, भाजपा तालुका महामंत्री संजयजी खेडेकर, पंढरीनाथ चुनारकर, मनोहर पा. देशमुख, रमेश पा. नागपुरे, प्रभाकरराव धोटे, गिरीधर गोहने, प्रभाकर लोडे, लालाजी गोहने यांसह कान्होली परिसरातील असंख्य भक्त उपस्थित होते.

हा कार्यक्रम भक्तिरसात न्हालून निघाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *