■ स्व. लक्ष्मणजी शिवरकर यांच्या निधनानंतर कुटुंबाला दिला आधार
चिमूर समाचार : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी तालुकाध्यक्ष डॉ. दिलीपजी शिवरकर यांचे वडील स्व. लक्ष्मणजी शिवरकर यांचे आज वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिवरकर कुटुंब, नातेवाईक, तसेच स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
स्व. लक्ष्मणजी यांच्या निधनाची दुःखद वार्ता मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी मौजा-नवतळा (ता. चिमूर) येथे शिवरकर परिवाराची भेट घेतली.
या सांत्वन भेटीत त्यांनी शिवरकर कुटुंबियांसमवेत संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होण्याची भावना व्यक्त केली. त्यांनी ईश्वराकडे स्व. लक्ष्मणजींच्या आत्म्याच्या चिरशांतीसाठी प्रार्थना केली. तसेच कुटुंबाला या दुःखाच्या प्रसंगी संकट सहन करण्याचे बळ मिळावे, अशी मनोकामना केली.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिशभैया शर्मा, जिल्हा संघटन महामंत्री संजयजी गजपुरे, ज्येष्ठ नेते डॉ. श्यामजी हटवादे, विधानसभा प्रमुख गणेशभाऊ तर्वेकर, माजी तालुकाध्यक्ष होमदेवजी मेश्राम, शक्ती केराम यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवरकर कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे सहकार्य हा कुटुंबासाठी मोठा आधार ठरला आहे.