- Breaking News, नागपुर समाचार, राजनीति

नागपुर समाचार : उबाठा शिवसेनेमधून, तालुका प्रमुख यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामध्ये प्रवेश केले

नागपुर समाचार : मा. आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, यांच्या नेतृत्त्वाखाली,‌ मा. डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन अध्यक्ष खासदार, मा. डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब व वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक मा. आदरणीय श्री मंगेशजी चिवटे साहेब, वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष मा. श्री रामहरी राऊत साहेब, यांच्या मार्गदर्शनात, व समाजकार्य प्रवेश कार्यक्रमाचे नेतृत्व पुर्व विदर्भ प्रमुख श्री प्रवीण शर्मा यांनी केले. कार्यक्रमाअंतर्गत, उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम बघणारे मा. श्री. महेंद्र मनोहर भुरे साहेब यांनी, आपल्या शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात स्वतःहून प्रवेश घेतला आहे.त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना, वैद्यकीय मदतकक्षा मध्ये पक्षप्रवेश केला.

काल संध्याकाळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुर्व विदर्भ प्रमुख मा. श्री. प्रवीण लताबालमुकुंद शर्मा( भाऊ ) यांनी आपल्या धंतोली येथील, शिवसेना विदर्भ कार्यालयात, सर्व वैद्यकीय मदत कक्षाचे पुर्व विदर्भ पदाधिकारी, नागपूर जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या मार्फत त्यांचा प्रवेश करण्यात आला. त्यानंतर मा.श्री महेंद्र मनोहर भुरे साहेब, त्यांची नियुक्ती वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामध्ये, नागपूर ग्रामीण संपर्क प्रमुख, म्हणून मा. श्री. प्रवीण लताबालमुकुंद शर्मा भाऊ (पुर्व विदर्भ प्रमुख) यांनी केली.

वैद्यकीय मदत कक्ष चे, पुर्व विदर्भच्या सर्व पदाधिकारी आणि नागपूर जिल्हा प्रमुख व नागपूर तालुकाच्या सर्व वैद्यकीय दूत यांच्या समक्ष त्यांची नियुक्ती करण्यात आली व यावेळी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चे पुर्व विदर्भचे सर्व पदाधिकारी, तसेंच नागपूर जिल्हा पदाधिकारी व दूत या सर्वांनी मा श्री. महेंद्र मनोहर भुरे यांचे मनस्वी स्वागत व अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा प्रमुख श्री सचीन भाऊ शर्मा, महिला आघाडी पुर्व विदर्भ समन्वयक सौ अश्विनीताई लिल्लारे, नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री राहुल हेडाऊ व सौ शिल्पाताई रामेलवार, श्री अंतन पुरी, श्री अजय नवलकर, श्री अंकित धुपे, श्री सुनील पिल्ले, कार्यालय प्रमुख यशवंत डहाके, हे सर्व वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारी व दूत प्रवेश कार्यक्रमात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *