सावली समाचार : खास वसंत पंचमी मंडई च्या मंगलमय पर्वावर निमगांव येथे अनंत नाट्य कला मंडळ, मौजा निमगांव (तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर) यांच्या वतीने *संगीत: – “भिकारी”* या भावस्पर्शी नाटक कलाकृतीचे भव्य आयोजन करण्यात आले. या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फित कापून नाटकाचा शुभारंभ करण्यात आला.
भिकारी या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मा.खा. अशोकजी नेते यांनी नाटकाच्या सामाजिक दृष्टीकोनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले,
“नाटक ही केवळ करमणुकीची साधनं नसून ती समाजप्रबोधनाची प्रभावी माध्यम आहेत. ‘भिकारी’ सारख्या नाट्यकृती समाजाला आरसा दाखवतात, विचार करायला भाग पाडतात. अशा नाटकांमधून मिळणारे संदेश समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यास मदत करतात. प्रेक्षकांनी या कलाकृतीचा आस्वाद घेत त्यातून प्रेरणा घ्यावी.”
लोकसभेच्या निवडणुकीचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले
“संविधान बदलाच्या खोट्या प्रचारामुळे मतदारांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे पराभव स्वीकारावा लागला, मात्र निमगांव या आपल्या गावातील जनतेने मला भरघोस पाठिंबा देत मतदानरुपी आशीर्वाद दिला. त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. मी गेल्या दहा वर्षांत अनेक विकासकामे केलेली आहेत.आता केंद्रात व राज्यात आपले सरकार असून या सरकारच्या सहकार्याने विकासाची गती थांबणार नाही. जनतेच्या विश्वासास पात्र राहून कार्य करण्याची माझी सदैव तयारी राहील.”असे प्रतिपादन या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी मा.खा.अशोकजी नेते यांनी केले.
या भव्य नाट्यप्रयोगास यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाशभाऊ पाल, भाजपा तालुकाध्यक्ष अर्जुनभाऊ भोयर, सामाजिक नेते देविदासजी बानबले, ज्येष्ठ नेते दौलतजी भोपये, भाजपाचे युवा नेते तथा ओबीसी नेते कविंद्रजी रोहनकर, ज्येष्ठ नेते अरुणभाऊ पाल, भाजपा कोषाध्यक्ष तथा युवा नेते किशोरजी वाकुडकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष नितिनजी कारडे, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री प्रतिभाताई बोबाटे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा छायाताई चकबंडलवार, सरपंच गीताताई लाकडे, प्रॉपर्टी डीलर्स चे मालक जितुभाऊ धात्रक, युवा नेते सुरज किनेकर, युवा नेते विनोद धोटे, युवा नेते गिरीश चिमूरकर, सामाजिक नेते संतोष थोरात, भाजपा नेते अभय लाटकर, ग्रामपंचायत सदस्या रंजू जुनघरे, शालू लाटकर, किशोर खेडेकर, प्राध्यापक झाडे सर, जगदीश चापले, हुलकेजी तसेच नाटक आयोजक मंडळाचे मुक्तेश्वर थोरात, प्रमोद वालदे, रोशन कन्नाके आदी मान्यवर उपस्थित होते.
“भिकारी” हे नाटक केवळ करमणुकीपुरते मर्यादित नसून, त्यात सामाजिक जाणीवेचा मोठा भाग आहे अशा नाट्यप्रयोगां मधून समाजाला दिशा मिळावी, लोकांनी त्यातून शिकावे आणि आपल्या जीवनात सकारात्मकता आणावी, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.