नागपुर समाचार : वर्ष 1995 पासुन सौर उर्जेचा प्रचार, प्रसार करणारा तरुण उद्योजक ते भारतीय सेनेकरिता संसाधन निर्मिती करणाऱ्या उद्योजकाची रोचक कथा, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूरच्या सभागृहात दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ०५:३० वाजता आयोजित केली आहे.
श्री सत्यनारायणजी नुवाल, तरुण उद्योजक, यांचा प्रवास आणि उत्कर्ष बघून फोरब्स या जागतिक संस्थेने त्याच्या कायम प्रगती पथावर असण्याचे गुपित नवीन उघड केले आहे. अगदी सामान्य सरकारी नोकरदारचा मुलगा असलेले नुवाल, बालपणापासून उद्योगपती समर्पित असल्याचे समजते. त्यांचा पहिला औद्योगिक उपक्रम वय वर्ष १७ मध्ये सुरू झाला. सौर ऊर्जा ते विस्फोटक संसाधनाच्या निर्मिती पर्यन्त ते पोहचले आहेत.
निर्यात, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा उभारणी, कोळसा कंपन्या आणि संरक्षण इत्यादी त्यांचे कामाचे क्षेत्र आहेत. वर्ष १९९५ पासून म्हणजे गेल्या तीन दशकात, उभा झालेला आणि जगभरात विस्तारलेल्या उद्योगाच्या नुमद विविध शाखा आहेत. झीरो ते बिलियन डॉलर, सांगायला सहज वाटते, पण मिळवायला व्यवस्थापणाचे कसब अंगी असायला पाहिजे. वेळोवेळी ते कुठे, कसे आणि किती? अवगत केले, हे समजून घ्यायची संधी नागपूरकर तसेच विविध व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यांनकरिता विज्ञान भारती विदर्भ प्रांत आणि भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमा व्दारे चालून आलेली आहे.
प्रमुख पाहुणे: श्री सत्यनारायणजी नुवाल
मुलाखत : डॉ मैत्रेयी, संचालक/निर्देशक IIM, नागपूर व श्री रामकृष्णन, उपाध्यक्ष विभा, विदर्भ प्रांत.
स्थळ: भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर
दिनांक: १५ फेब्रुवारी, २०२५ शनिवार, साय. ०५:३० ते ०८:००