- Breaking News, नागपुर समाचार, सम्मानित

नागपुर समाचार : श्री. संदीप जोशी यांना विधान परिषद सदस्य म्हणून प्रमाणपत्र प्रदान 

नागपूर समाचार : विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये नागपूर शहराचे माजी महापौर श्री. संदीप जोशी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर विधान भवनामध्ये त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. श्री. संदीप जोशी शुक्रवारी २१ मार्च रोजी विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेणार आहेत.  

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून श्री. संदीप जोशी यांची निवड केली होती. या निवडीनंतर श्री. जोशी यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री श्री. अमित शाह, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे आभार मानले होते. विधान परिषदेचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर श्री. संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेउन त्यांचे आभार देखील मानले होते.

गुरुवारी २० मार्च रोजी विधिमंडळ प्रशासनाच्या वतीने श्री. संदीप जोशी यांना विधान परिषदेचे सदस्य म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *