- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार

नागपुर : कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट वाढून आता २१ दिवसात

नागपूर : कोव्हिडच्या वाढत्या प्रादुभार्वामध्ये नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. नागपूर शहरात कोरोना बाधित रुग्णांचा डबलिंग रेट १५ दिवसांवरून वाढून तो २१ दिवस झाला आहे. आरोग्य विभागाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार आता शहरात २१ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की, अगोदर कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट १५ दिवस होता. तो वाढून आता २१ दिवसांचा झाला आहे. २७ जूलैनंतर यामध्ये मोठी सुधारणा झालेली दिसून येत आहे. आरोग्य विभागानुसार जून महिन्यात डबलिंग रेट ४४ दिवसांचा होता नंतर जुलै आणि ऑगस्ट मध्ये १५ दिवसांपर्यंत आला आणि आता २१ दिवसपर्यंत पोहचला आहे, ही दिलासादायक बाब आहे.

डबलिंग रेट वाढल्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचा निष्कर्ष काढता येउ शकतो. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतकांची संख्या सतत वाढत आहे. महानगरपालिकेची यंत्रणा यावर नियंत्रण आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मागील २० दिवसांमध्ये मनपाच्या माध्यमातून ५० कोव्हिड चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मनपाची रॅपिड रिस्पॉन्स टिम पॉझिटिव्ह रुग्णांचे ‘हायरिक्स कॉन्टॅक्ट’ शोधून त्यांची चाचणी करीत आहे.

आय.ए.एस. श्रीमती मनीषा खत्री यांनी सांगितले की, कोरोना रुग्ण आपली माहिती लपवत आहेत. ते आपले फोन नंबर, घरचा पत्ता आणि घरी मधुमेह, बी.पी.सारखे आजार असलेले रुग्णांची माहिती देत नाही. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होत आहे. कोणतिही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत चाचणी करुन वेळेवर उपचार घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *