महापौरांची क्रेडाई पदाधिका-यांसमवेत चर्चा
नागपूर : नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या वतीने स्टेक होल्डर्स मीटचे श्रृंखला अंतर्गत शहरातील बिल्डर्स आणि डेव्हलपर्स ची सभा शुक्रवारी स्मार्ट सिटीचे कॉन्फरन्स हॉल मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतमध्ये आयोजित करण्यात आली होती. महापौर व स्मार्ट सिटीचे संचालक श्री संदीप जोशी यांनी सभेची अध्यक्षता केली. स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) श्री. महेश मोरोणे व क्रेडाई नागपूर मेट्रो चे प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. महापौर श्री संदीप जोशी यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
क्रेडाई च्या प्रतिनिधी यांना संबोधित करताना श्री.संदीप जोशी म्हणाले की, नागपूरचा विकास करण्यासाठी सगळयांना सोबत येऊन सहकार्य करण्याची गरज आहे. नागपूर शहराला ‘लाईव्हली’, ‘सेफ’, ‘सस्टेनेबल’ व ‘हेल्दी’ शहर करण्याच्या दृष्टीने भरघोस मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी १८ कि.मी. चे रस्त्यावर डेडीकेटेड बायसिकल लेन तयार करण्याचे स्मार्ट सिटीचे प्रस्तावाची प्रशंसा केली. ही व्यवस्था नागपूरच्या नागरिकांना निरोगी ठेवण्यासाठी उत्तम ठरेल, असे ही त्यांनी सांगीतले.
यापूर्वी सी.ई.ओ. (प्रभारी) श्री. महेश मोरोणे यांना प्रतिनिधी समोर स्मार्ट सिटीस्ज् मिशन अंतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. स्मार्ट सिटीस्ज् मिशन केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाने २०१५ मध्ये सुरु केले आहे. नागपूरचा देशातील १०० शहरांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीस्ज् मिशन अंतर्गत केंद्र शासनाने “इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज” हा उपक्रम सुरु केला आहे. हा कार्यक्रम तीन टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. प्रथम चरणामध्ये नागपूरात लहान-लहान उपाय करुन सायकलिंग ला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सोबतच नागरिकांमध्ये वातावरण निमिर्ती करुन त्यांना रोजचे कामांसाठी सायकलचा वापर करण्यासाठी प्रवृत केले जात आहे.
नागपूरात सायकल चालविण्या योग्य १८ कि.मी. रस्त्यांवरती डेडीकेटेड बायसिकल लेन तयार करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सायकलला प्राधान्य दयावे यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. या दृष्टिने नागपूर शहराने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हॅन्डल बार सर्व्हे व्दारा एका आठवडयात १८ कि.मी. चे रस्ते सायकलिंग साठी निश्चित केले व या रस्त्यांवर स्मार्ट सिटीचा एकही पैसा खर्च न करता सी.एस.आर. निधीतून दोन कोटी किंमतीचे काम करण्यात येणार आहे. नागपूरला सायकल कॅपिटल ऑफ इंडिया करण्याचा निर्धार स्मार्ट सिटी ने घेतला आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की नागपूर मध्ये 10 थिम पार्क विकसित करण्यात येणार आहे. यांच्यात हॅप्पी थॉट गार्डन व आर्ट गार्डन याचा प्रथम चरणात समावेश राहील.
क्रेडाई चे अध्यक्ष श्री महेश साधवानी यांनी स्टेक होल्डर्स चा एक टूर स्मार्ट सिटी एरिया मध्ये आयोजित करण्याचे प्रस्ताव दिले. त्यांनी स्मार्ट सिटी च्या सायकल कॅपिटल ऑफ इंडिया करण्याचे निर्धाराचे स्वागत केले आणि क्रेडाई तर्फे मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी महापौर श्री जोशी यांनी आय आय टी रूरकी मध्ये पी एच डी साठी निवड झालेले स्मार्ट सिटीचे आर्कीटेक्ट श्री. अमित शिरपूरकर यांचा सत्कार केला तसेच त्यांनी चीफ प्लानर राहुल पांडे, स्वप्नील सावलकर व शारदा मेंढे यांनी उत्तम रितीने कार्यक्रमाचे आयोजन केल्याबददल सत्कार केला. इकली चे प्रोजेक्ट ऑफिसर शार्दूल वेणेगुरकर यांनी बी.ई.ऐ. अंतर्गत इको फ्रेंडली घर किंवा अपार्टमेंट बांधण्यासंबंधी मार्गदर्शकतत्वे याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ प्रणिता उमरेडकर यांनी केले. आभार कंपनी सेक्रेटरी श्रीमती भानुप्रिया ठाकूर यांनी मानले. क्रेडाई चे पदाधिकारी सर्वश्री अनिल नायर, गौरव अग्रवाल, अशोक चांडक, जेठानंद खंडवानी, विजय ठाकूर, मोहन चोइथानी, विजय जोशी, विवेक कुणावर व बायसिकल मेयर दीपांती पॉल उपस्थित होते.
स्मार्ट सिटीचे अधिकारी राजेश दुपारे, अधि. मनजीत नेवारे, डॉ. शील घुले, मोईन हसन, श्रीकांत अहीरकर, अमृता देशकर, सोनाली गेडाम, डॉ. संदीप नारनवरे, अनूप लाहोटी, आरती चौधरी, मनीष सोनी आणि कुणाल गजभिये आदी उपस्थित होते.