इमारत बांधकाम कामगार नोंदणीतील गैरप्रकारावर संताप ख-या गरजु लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी धडक मोहिम राबविणार
रामटेक : इमारत बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरण करताना लाभार्थ्यांना होत असलेला त्रास, दलालांची कामे प्राधान्याने व गरजु लाभार्थ्यांना हेलपाट्या मारायला लावले जात असल्याची तक्रार प्राप्त होताच सर्व तक्रारकत्र्यांना व त्रासलेल्या बांधकाम मजूरांना घेवून अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात धडक दिली व अनेक अनियमितता व गैरप्रकार उघडकीस आणले. अधिका-यांचे खोटे शिक्के व सहया मारून बोगस लाभार्थ्यांची नोंदणी व नुतनीकरण झाल्याचे उघडकीस आले व काही अधिका-यांनी गरजु बांधकाम मजूरांना परत केले.
त्यांचा योग्य तो क्लास घेवून हे अजिबात चालणार नाही, अशी ताकीद दिली. सहा. कामगार आयुक्त श्री. राजदीप धुर्वे यांना या प्रकरणात पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच वेगवेगळया बांधकाम मजूरांना व सर्व क्षेत्रातील असंघटित कामगार यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत धडक मोहिम राबविण्याकरिता नियोजन केले.
लाॅकडाउनच्या कालखंडात असंख्य लाभार्थ्यांना 5,000/- चे अर्थसहाय्य नुतनीकरण न झाल्याने मिळाले नाही. त्यांचे तात्काळ नुतनीकरण करून त्यांना लाभ देण्याबाबत तसेच या विभागातील अनेक शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना कसा देता येईल, याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे सूचना दिले.
भविष्यात घरेलु कामगार, माथाळी कामगार, सुरक्षा रक्षक व इतर मजूर वर्गांच्या हितासाठी कोणत्या योजना राबविता येईल, याबाबत चर्चा करून नियोजन करण्यात आले. सर्व प्रलंबित अर्जांवर तात्काळ मंजूरी दयावी व यासाठी स्वतंत्र कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्याबाबत मुंबई येथील वरिश्ठ अधिकारी श्री. श्रीरंगम यांच्याशी चर्चा करण्यात आली.