सेफ ॲड स्मार्ट सिटीच्या कामाचा घेतला आढावा
नागपूर : नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या वतीने लागू करण्यात येणारे नागपूर सेफ ॲड स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या कामाचा आढावा पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी मनपा च्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील स्मार्ट सिटी कॉन्फरन्स हॉल मध्ये घेतला.
बैठकीचे आयोजन नागपूर स्मार्ट सिटीच्या ई-गर्व्हनेंस विभागाच्या वतीने करण्यात आले होते. बैठकीत अतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री. सुनील फुलारी, दिलीप झलके, एन.डी.रेडडी, पोलीस उपायुक्त सर्वश्री. विक्रम साळी, विवेक मसाळ, राहुल माकणीकर, गजानन राजमाने, श्वेता खेडकर, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, वाहतुक अभियंता शकील नियाजी व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश मोरोणे उपस्थित होते.
पोलिस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी स्मार्ट सिटीच्या वतीने नागपूरात लावण्यात आलेले ३६०० सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमाने गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यात येणा-या प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, कॅमे-यांच्या माध्यमाने गुन्हेगारांना पकडण्यात यश प्राप्त झाले आहे. येणा-या काळात या तंत्रज्ञानाचा अधिक वापर करुन गुन्हेगारीवर अंकुश लावण्यात येईल. त्यांनी सांगितले की, सीसीटीव्हीच्या माध्यमाने वाहतुकीला सुरळीत करण्याची आवश्यकता आहे.
यासाठी वाहतुक पोलिस विभाग व नागपूर स्मार्ट सिटीचे संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे. व्ही.ए.एम.एस च्या माध्यमाने वाहतुक पोलिस संबंधी जनजागृती करण्याचे पण त्यांनी निर्देश दिले. तसेच त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाजवळ सेन्ट्रल कमांड ॲन्ड कंट्रोल सेन्टर चे कार्याचा आढावा घेतला आणि हे काम नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधीतांना दिले. यापूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे स्वागत स्मार्ट सिटीच्या कंपनी सेक्रेटरी भानुप्रिया ठाकूर यांनी केले.
बैठकीच्या नंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार व अन्य अधिका-यांनी श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरची सुध्दा पाहणी केली. स्मार्ट सिटी ई-गर्व्हन्सचे जी.एम.डॉ. शील घुले यांनी त्यांना सिटी ऑपरेशन सेंटरच्या विविध कार्याची माहिती दिली. बैठकीत डॉ. शील घुले, ई. ॲन्ड वायचे समीर शर्मा, एल.ॲन्डटी.चे अजय रामटेके, आशीष भगत, अनूप लाहोटी, आरती चौधरी, कुणाल गजभिये आदी उपस्थित होते.