- Breaking News, नागपुर समाचार, संत्रानगरी

नागपुर : दुसऱ्या फेरी अखेर पहिल्या पसंतीच्या उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांची घोषणा

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये दुसऱ्या फेरीअखेर एकूण ५६ हजार मतांपैकी ४ हजार ७६९ अवैध व ५१ हजार २३१ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत.

अभिजीत वंजारी २४ हजार ११४, संदीप जोशी १६ हजार ८५२, राजेंद्रकुमार चौधरी ९२, इंजीनियर राहुल वानखेडे १हजार ५२१, ॲङ सुनिता पाटील ६५, अतुलकुमार खोब्रागडे ३ हजार ६४४, अमित मेश्राम ३५, प्रशांत डेकाटे ६०९, नितीन रोंघे २२८, नितेश कराळे २ हजार ९९९, डॉ. प्रकाश रामटेके ६८, बबन तायवाडे ४१, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार २५, सी.ए. राजेंद्र भुतडा ७३१, प्रा.डॉ. विनोद राऊत ७८, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ३८, शरद जीवतोडे १७, प्रा. संगीता बढे ४१ आणि इंजीनियर संजय नासरे ३३ मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी होत आहे. तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *