आळंदीत आजपासून संचारबंदी लागू
पुणे : संपूर्ण वारकरी संप्रदायाचे आराध्यस्थान असलेले पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर 720 व्या संजीवन समाधीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीत आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
आळंदीत 724 व्या संजीवन समाधीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आळंदीत आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यामधील आळंदी परिसरात 6 डिसेंबर पासून संचारबंदी लागू झाली आहे. येत्या 11 डिसेंबरला कार्तिकी एकादशी तर 13 डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी राज्यातून चार ते पाच लाख भाविक संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर माथा टेकवायला येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि मंदिर प्रशासनाने संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने 6 ते 14 डिसेंबर दरम्यान संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे यंदाचा संजीवन समाधी सोहळ्याचा हा सप्ताह कमीत कमी 20 ते जास्तीत जास्त 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आली का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर प्रशासनाकडून यावर उपाययोजना केल्या जात आहेत.