नागपूर : महामानव, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालय येथील डॉ. आंबेडकर यांच्या तैलचित्राला उपमहापौर मनीषा कोठे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पुष्प अर्पित केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त व संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त महेश धामेचा, डॉ. विजय जोशी, मनीष सोनी, राजेश वासनिक आणि प्रमोद हिवसे उपस्थित होते.