भंडारा : खासदार श्री प्रफुल पटेल यांचे आज 2 दिवसीय दौऱ्यासाठी भंडारा जिल्हयात आगमन झाले. आज लाखाांदुर तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने मासळ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून खा. पटेल व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
भंडारा – गोंदिया जिल्हयात काय घडते हे मला कोणी वरचा माणूस सांगत नाही याची मला जाणीव आहे. आम्ही आपल्या शेतकरी बांधवाचे हिताचे रक्षण व्हावे या साठी झटत आहो. केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकरी बांधव संकटात आहेत. शेतकरी बांधवांना नेहमीच काही ना काही अडचणी असतात कधी रोवणे उशिरा होत आहेत, तर कधी पुर येत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
आपल्या शेतकरी बांधवांचा नुकसान होऊ नये असे आमचे मत आहे. शेतकऱ्यांना केंद्र शासनाचा हमी भावात आपले धान विक्री करणे परवडत नाही म्हणून आम्ही धानाला 700/- बोनस मिळवून दिला आहे ज्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षी सुध्दा 1400 कोटीची निधी मिळणार असे मत खा. पटेल यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करतांना व्यक्त केले. कार्यक्रमात धानाला 700/- रुपये बोनस मिळवून दिल्या बद्दल खा. पटेल यांचे शाळ श्रीफलाने सत्कार करण्यात आले.
मासळ येथे आयोजित कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात खा. श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री जिला अध्यक्ष नानाभाऊ पंचबुध्दे, आमदार राजु कारेमोरे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, यशवंत सोनुकसरे, बालु चुन्ने, देवीदास राऊत, शंकर खराबे, डोंगरेजी, राकेश राऊत, धनराज वासनिक, मंगेश ब्राम्हणकर, मनोज ठाकरे, इंदुताई कठाने सोबत इतर पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येत उपस्थित होते.