सॅनिटायजर तसेच मास्क वितरीत करण्यात आले
नागपुर : ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त जिवनधारा प्रौढ मतिमंदाची निवासी औद्योगिक कर्मशाला पुनर्वसन केंद्र, नागपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रविण पुरी, संस्था अध्यक्ष मा. ज्ञानेश्वरवरजी दुल्लवार सर, कर्मशालेच्या व्यवस्थापकिय अधिक्षिक श्रीमती पुष्पा उप्पलवार मॅडम, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पूरी यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त कर्मशालेत 0 ते 6 वयोगटातील मुलांसठी सुरू करण्यात आलेल्या शिघ्र निदान व उपचार केद्राबद्दल मागदर्शन केले. कर्मशालेच्या व्यवस्थापकिय अधिक्षिका श्रीमती पुष्पा उप्पलवार मॅडम यांनी आपल्या भाषणात सर्वाना जागतिक अपंग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच शिघ्र निदान व उपकार केद्राबद्दल सविस्तार माहिती दिली.
तसेच उपस्थित पालकांचे आणि विधार्थीना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सॅनिटायजर तसेच मास्क वितरीत करण्यात आले. विधार्थाचा घरी जाऊन त्यांचे देखील स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमति विणा दवईकर यांनी केला.