नागपूर समाचार : नागपूर शहरात कोरोनाचे थैमान सुरु असताना काही तरी रुग्णांचे जीव वाचविण्याच्या भावनेतून आमदार कृष्णा खोपडे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी पूर्व नागपूरच्या वतीने प्लाझ्मा डोनेट करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन करताना आमदार कृष्णा खोपडे व विकास कुंभारे यांनी प्लाझ्मा डोनेट करीत युवकांना सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. कार्यक्रमात एकूण 20 जणांनी प्लाझ्मा डोनेट करून सहयो दिला. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण शहरात सुरु आहे.
आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटात प्रत्येकाने किमान दोन व्यक्तींचे जीव वाचविण्याचा कसोटीने प्रयत्न केले पाहिजे. मी स्वत:, आमदार विकास कुंभारे व माझे वाहनचालक यांनी देखील प्लाझ्मा डोनेट करून प्रोत्साहित करण्याचे काम केले. प्लाझ्मा हा कोणत्याही कारखान्यात निर्माण होत नसून मानवी शरीरातचा हा निर्माण होतो. तेही कोविड होऊन बरे झालेल्या व्यक्तीमध्ये विशेषत: आढळतो. तेव्हा कोविड होऊन बरे झालेल्या रुग्णांनी स्वत: समोर येऊन प्लाझ्मा डोनेट केला पाहीजे. असे आव्हान आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.
पूर्व नागपूरचे भा.ज.प. अध्यक्ष संजय अवचट यांनी सांगितले की, मागील वर्षी भा.ज.प. पूर्व नागपूरच्या वतीने कम्युनिटी किचन, किटचे वाटप, रक्तदान शिबीर आदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच प्लाझ्मा डोनेट शिबीरमध्ये 18 व्यक्तींनी प्लाझ्मा डोनेट केला होता. तसेच गडकरी साहेबांचे वाढदिवशी तब्बल 1725 युवकांनी रक्तदान केले होते. मात्र यावर्षी कोरोना जेव्हा परतून आला, तेव्हा मागच्या महिन्यात पुन्हा 523 युवकांनी रक्तदान केले. अशा वेळी अनेक रुग्ण नागपुरात मृत्युमुखी पडत असून काही लोकांचा तरी जीव वाचविण्याचा प्रयत्न केला पाहीजे, अशी भावना आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या भावनेचा सन्मान करीत आज सतरंजीपुरा येथील जनसंपर्क कार्यालयात प्लाझ्मा डोनेट शिबिरचे आयोजन करण्यात आले. यात आमदार कृष्णा खोपडे व विकास कुंभारे यांनी देखील प्लाझ्मा डोनेट करून युवकांना प्लाझ्मा डोनेट करण्यास प्रोत्साहित केले.
प्लाझ्मा डोनेट करणा-या युवकांमध्ये नगरसेवक बंटी कुकडे, अजय मरघडे, अनिकेत ठाकरे, राजेंद्र गोतमारे, विनोद बांगडे, मंगेश धार्मिक, वैभव शर्मा, हर्शल मलमकर, गोपाल पाचबुधे, हेमंत बारापात्रे, महेंद्रकुमार नेताम, मंगेश आडकीने, मनोज बतरा, रोहित हेडाऊ, सचिन धार्मिक, संजय धार्मिक, प्रकाश रोकडे, सुरेश वाघमारे आदी युवकांनी प्लाझ्मा डोनेट करून सहयोग दिला.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी संजय अवचट, प्रमोद पेंडके, रामभाऊ आंबुलकर, सन्नी राऊत, महेंद्र राऊत, नगरसेवक मनोज चापले, बंटी कुकडे, दिपक वाडीभस्मे, राजू गोतमारे, जे.पी.शर्मा. सेतराम सेलोकर, सुनिल सूर्यवंशी, सचिन करारे, सुनिल कोठे, चक्रधर अतकरे, शरद पडोळे, गुड्डू पांडे, विवेक ठवकर, पिंटू पटेल, विकास रहांगडाले, महेश मानापुरे आदींनी सहयोग केला.