नागपूर, ता. ६ : नागपूरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १८ वर्ष ते ४४ वर्षामधील नागरिकांचा लसीकरण करण्यासाठी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी सर्व आमदारांना रुपये एक कोटी त्यांच्या आमदार निधीतून देण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत आमदार, माजी महापौर व भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष श्री. प्रवीण दटके यांनी १८ वर्ष ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लस पुरविण्याकरीता आमदार निधीतून मनपाला रु १ कोटी उपलब्ध करुन देण्याचे पत्र महापौरांना दिले. यावेळी स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर सुध्दा उपस्थित होते.
Related Posts
