नागपूर, ता. १० : नागपूर शहराकरीता लसीचा साठा प्राप्त न झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण मंगळवारी ११ मे ला होणार नाही. ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली.
तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी मंगळवारी ६ केन्द्र सुरु राहतील. यामध्ये कोव्हेक्सीन लसीकरण स्व.प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केन्द्र, छाप्रु सर्वोदय मंडळ हॉल छाप्रुनगर सेंट्रल एव्हेन्यू, राजकुमार गुप्ता समाज भवन,बजेरिया, विरंगुळा केंद्र, जयहिंद सोसायटी, NITग्राउंड जवळ, मनीष नगर, डॉ आंबेडकर हॉस्पिटल,व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) या ठिकाणी करण्यात येईल.
विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.