*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०८ वा दीक्षांत समारोह संपन्न*
*माजी सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे ‘विधी पंडित’ पदवीने सन्मानित*
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज झालेल्या १०८ व्या दीक्षांत समारोहात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांना मानवविद्या शाखेतील ‘विधी पंडित’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या समारोहात न्या. शरद बोबडे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव श्रीनिवास शरद बोबडे यांनी मानद पदवीचा स्वीकार केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांचे दीक्षांत भाषण झाले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, प्रकुलगुरू डॉ संजय दुधे व कुलसचिव डॉ राजू हिवसे प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यपालांच्या उपस्थितीत ७७९१२ स्नातकांना पदवी व पदवी प्रमाणपत्रे तसेच सुवर्ण व रौप्य पदके प्रदान करण्यात आली. दोन उमेदवारांना मानव विज्ञान पंडित (डी.लिट.) ही पदवी तसेच ८६७ स्नातकांना आचार्य (पीएच.डी.) पदवी देण्यात आली.
*Governor confers Doctor of Laws on former CJI Sharad Bobde*
The Governor of Maharashtra and Chancellor of Universities in the State Bhagat Singh Koshyari conferred the Honorary Doctor of Laws (LLD) on the former Chief Justice of India, Justice Sharad Arvind Bobde at the 108th Convocation of the Rashtra Sant Tukadoji Maharaj Nagpur University (RTMNU) held online.
The Honorary degree awarded to Justice Sharad Bobde was accepted by his son Shrinivas Bobde. Former Judge of the Supreme Court, Justice Vikas Sirpurkar delivered the Convocation Address.
The Governor also presented degrees and diplomas to 77912 graduating students. Gold and Silver Medals and cash prizes were also given away to meritorious students. While D.Litt. was presented to 2 candidates, Ph.Ds were presented to 867 candidates.
Vice Chancellor of RTMNU Dr Subhash Chaudhari, Pro Vice Chancellor Dr Sanjay Dudhe and Registrar Dr Raju Hiwase were present.