- नागपुर समाचार

स्व. गोविंदराव मोंढे यांच्या जन्मदिनानिमित्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण, ‘गोविंदबाग’चे विमोचन

NBP NEWS 24,

1 AUGUST 2021.

नागपूर – श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्री. गोविंदराव मोंढे साहेब यांच्या जन्मदिनानिमीत्त रविवारी (१ आगस्ट) केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. यावेळी स्व. मोंढे साहेब यांनी सहकार, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अधोरेखित करणाऱ्या ‘गोविंदबाग’ या स्मरणिकेचे प्रकाशनही ना. गडकरी साहेब यांच्या हस्ते झाले.

           यावेळी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल मोंढे, ‘गोविंदबाग’या स्मरणिकेचे संपादक नितीन नायगांवकर संस्थेचे उपाध्यक्ष परमानंद लोणारे, संचालक श्री अविनाश तागडे, देवराव जिकार, व्यवस्थापक श्री पौनिकर, शेळके, सावरकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. स्व. गोविंदराव मोंढे साहेब यांनी २५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन नितीनजी गडकरी यांच्याच हस्ते झाले होते. त्यानंतर गेल्या २५ वर्षांत स्व. गोविंदराव मोंढे साहेब व संस्थेने केलेल्या प्रगतीचे ना. गडकरी साहेब स्वतः साक्षीदार आहेत. संस्थेने सामाजिक बांधिलकी जपून सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण केल्याबद्दल नितीनजी गडकरी यांनी कौतुक केले. तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *