‘नॅशनल अलायन्स ऑफ सिकल सेल ऑर्गनायझेशन’च्या राष्ट्रीय कार्यालयाचे उद्घाटन
नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरीजी यांनी आज नागपूरमध्ये सिकल सेल हा अनुवांशिक आजार असलेल्या रुग्णांसाठी कार्यरत ‘नॅशनल अलायन्स ऑफ सिकल सेल ऑर्गनायझेशन’च्या राष्ट्रीय कार्यालयाचे उद्घाटन केले.
सिकल सेल आजाराबाबत जनजागृती तसेच ठोस उपाययोजना करण्याची गरज असून संस्था याबाबत महत्त्वाचे काम करत असल्याचे श्री गडकरीजी यांनी सांगितले. तसेच सिकल सेल आजारावरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.