NBP NEWS 24
26-01-2022
हिंगणघाट:- स्थानिक टाका ग्राऊंड परिसरातील मखदुन बाबा सैय्यद वली र.हे.अ दर्गाह कमिटी परिसरातील स्वछतागृहाचे लोकार्पण काल दि.२५ रोजी विधानसभा क्षत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
स्थानिक संत चोखोबा वार्ड परिसरातील मुस्लिम बांधवांची तसेच दर्गाह कमिटीचे मागणीवरुन आमदार कुणावार यांनी सुमारे ९ लक्ष निधीतुन उपरोक्त बांधकाम मंजुर केले. गेल्या १८ मार्च रोजी या स्वच्छतागृहाची नगरपालिका क्षेत्रातील शासकीय जागेवर उपरोक्त निर्माणकार्य सुरु करण्यात आले होते.
येथे महिला तसेच पुरुषांसाठी वेगवेगळ्या स्वच्छतागृहाची करण्यात आली असून सदर विकासकाम बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
उपरोक्त स्वच्छतागृहाचे काम आता पूर्णत्वास आल्यानंतर काल दि.२५ रोजी याचे आ.कुणावार यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी दर्गाह कमिटीचे
शेख जुम्मनभाई, ताजू भाई,मो.रिजवान,मो.रहिमभाई,
सलिमभाई,सलीम कुरेशी,उबेदभाई,आरिफभाई,नायडूभाई,फारुख अंसार,आबिदभाई,मो.रेहान,रफीक ठेकेदार,मकसूद बावा,फिरोजभाई,कदीर तसेच श्रीमती कौसर अंजुम, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष बिस्मिल्ला खान, जगन्नाथजी कोटकर, पूनम ढोकपांडे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.