10वी, 12वी च्या परीक्षांच्या अडचणी वाढल्या आंदोलनाला मुख्यध्यापकांचाही पाठिंबा
नागपूर समाचार : दहावी व बारावीच्या परीक्षा होण्यासंदर्भातील अडचणी मध्ये आणखी वाढ झाली असून शाळा इमारती व इतर सुविधा उपलब्ध न करून देण्याच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या आंदोलनाला विविध शाळांच्या मुख्याध्यापकानी पाठिंबा दिला आहे.
आज सोमवारी या संदर्भात शाळा मुख्याध्यापकांची बैठक धीरन कन्या शाळेत पार पडली. नागपूर शहरातील 60 मुख्याध्यापक हजर होते.
सर्वांनी एक मुखाने परीक्षेत दहावी, बारावीच्या परीक्षेचा बहिष्काराला पाठिंबा दिला. सदर सभेस महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष माजी मंत्री विनोद गुडधे पाटील, सरकार्यवाह रवींद्र फडणवीस, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार व अनिल अग्रवाल, विजुक्टाचे व मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष गव्हाणकर व मुख्याध्यापक अनिल गोतमारे प्रदीप बिबटे, चंद्रकांत जावदंड हजर होते.