आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग २६ मध्ये विविध कार्यक्रम
नागपूर समाचार : पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्या जन्मदिनानिमित्ताने ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या पुढाकाराने प्रभाग २६ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
प्रभागात विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवून आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रभागातील संत गोरोबा कुंभार समाज भवन येथे रक्तदान शिबिर, डॉ. सारंग दांडेकर यांच्या हॅास्पीटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याशिवाय खंडवानी टाऊन-वाठोडा येथे ग्रीन जीमचे लोकार्पण करण्यात आले.
विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांमध्ये प्रा. प्रमोद पेंडके, संजय अवचट, सुनील सुर्यवंशी, सुरेश बारई, राजेश संगेवार, कृष्णा देशमुख , विनोद कुटे, राहुल महात्मे, रवि धांडे, सुनील आगरे, बाबूलाल तिवारी, सुरेश उदापूरकर, नंदकिशोर मेघनानी, अनतां शास्त्रकार, योगेश कुबडे, दीपक पाटील, दीपक शाहू, पपू तितरमरे, भरतभाई पटेल, गायत्री उचितकर,शारदा बराई, कविता हत्तीमरे, ज्योती वाघमारे, सिंधू पराते, कल्पना सर्वे, संगिता मोहरकर, शीला वासमवार, छाया गुजजेवार, रीना बेलखुडे, माया वानखेडे,करुणा पाटील , वर्षा मानकर, पूजा महात्मे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.