खानदेशातील महत्त्वपूर्ण धुळे तथा नंदुरबार जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आज धुळे येथे १,७९१.४६ कोटी रुपये किंमतीच्या व २६०. ९ किमी लांबीच्या २ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केंद्रीय मंत्री श्री नितीन जी गडकरी यांनी श्री सुभाष भामरे जी, खासदार हीना गावित जी, माजी मंत्री श्री गिरीश महाजन जी, धुळ्याचे पालकमंत्री श्री अब्दुल सत्तार जी, आमदार श्री कुणाल पाटील जी, आमदार श्री अमरिश पटेल जी तसेच इतर आमदार व अधिकारी यांच्या उपस्थितीत लोकार्पण व भूमिपूजन केले.
मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध धुळे जिल्ह्यातील शेतीमालाची वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे रस्ते प्रकल्प उपयोगी ठरतील. धुळे-नंदुरबार जिल्ह्यांना आधुनिक तसेच उच्च प्रतीचे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी भारतमाला योजनेंतर्गत नियोजित या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची गुजरात, कर्नाटक व इतर राज्यांशी कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल. धुळे, चाळीसगाव शहरांतील वाहनांची रहदारी कमी होण्यास मदत होईल.
या रस्ते प्रकल्पांमुळे नागरिकांना पितळखोरा गुहा-लेणी व गौताळा अभयारण्य या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. विश्वप्रसिद्ध अजिंठा लेणी व दौलताबाद किल्ला तसेच चाळीसगाव रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होईल. धुळे तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. शेवाळी-नंदुरबार रस्ते प्रकल्प परिसरातील आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल.