NBP NEWS 24,
NAGPUR.
नागपुर:- शनिवार 30 एप्रिल रोजी सायंकाळी 06:00 वाजता नूतन भारत विद्यालय अभ्यंकर नगर नागपुर येथे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ‘अभिज म्युझिकल ग्रुप’ चा बहारदार संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इंडियन आयडॉल फेम अभिजीत कडू आणि प्रेरणा वानकर यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच लतादीदींना स्वरांजली अर्पण करत, एकापेक्षा एक सरस गाणी सादर केलीत. कार्यक्रमाला उपसथित सर्व विद्यार्थी आणि नागरिकांनी गीतांचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाला भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री सरोदे सर, सचिव श्री रमेश बक्षी, सहसचिव श्री अतुल गाडगे,डॉ. निंबाळकर सर, शाळेचे माजी शिक्षक, श्री सुनील खानखोजे, श्री अशोकराव सोरटे, मुख्याध्यापिका डॉ. वंदना बडवाईक मॅडम, चव्हाण मॅडम, विद्यार्थी व मोठ्या संख्येत आजूबाजूच्या परिसरातील प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.