स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
नागपुर समाचार : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.9) रोजी 03 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली.
पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत नंगा पुतळा चौक, इतवारी येथील बाबा बॅग्स या दुकानाविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत लालगंज खैरीपुरा येथील सिंघ बॅग फॅक्टरी यांच्याविरुध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला.
तसेच लकडगंज झोन अंतर्गत भांडेवाडी येथील विशाल किराणा स्टोअर्स या दुकानाविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.