नागपूर:- बेसा नागपूर येथील दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर यांच्या वतीने राष्ट्रीय
सेवा योजना (NSS) व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) युनिट द्वारे 21 जून 2022 रोजी अंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना योगाचा सराव करून निसर्गाशी जोडण्यासाठी योग दिन उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.सौ.मीना देशमुख, योग प्रशिक्षक या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी होत्या. सदर कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली, यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व तसेच शारीरिक आणि मानसिक आजारांबद्दल जागरुकता आणि योगासनातून त्याचे उपाय डॉ. मीना देशमुख यांनी सांगितले.
या सत्रासोबतच डॉ. मीना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष योगासने केली. तसेच माणसाच्या जीवनात दैनंदिन पळापळीतून शारीरिक आरोग्याच्या पूर्णपणे आनंद कसे घेता येईल, उत्तम आरोग्य आणि आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल डॉ. मीना देशमुख यांनी सर्वांचे समपुदेशन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थाप्रमुख मनोज बालपांडे यांच्या मार्गदर्शनामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. उज्वला महाजन, तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) युनिट चे समन्वयक व प्राध्यापक डॉ. अजय पिसे, प्राध्यापक डॉ. निलेश महाजन, डॉ. अमोल वरोकर, डॉ. पुरुषोत्तम गणगणे, सचिन मेंढी व इतर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.