इतवारी रेल्वे स्टेशन नागपूर ला “महानत्यागी बाबा जुमदेवजी ” यांचे नाव देण्यातबाबत निवेदन
नागपुर समाचार : महानत्यागी बाबा जुमदेवजी मानवधर्म उगमस्थान संस्थान टिमकी नागपूर ट्रस्ट च्या वतीने इतवारी रेल्वे स्टेशन नागपूर ला “महानत्यागी बाबा जुमदेवजी ” यांचे नाव देण्यात यावे या बाबत दि.1/9/2022 ला मा. श्री बच्चूजी कडू, आमदार, अमरावती विधान सभा क्षेत्र, यांना अमरावती ला यांच्या राहत्या घरी भेटून ट्रस्ट चे सचिव राहूल भाऊ ठुब्रीकर, ट्रस्टचे विश्वस्त नरेश मदने जी व मार्गदर्शक गौरीशंकरजी चचाने आणि बाबांचे सेवक संजय देवळीकर, आशिष खापरे, युवराज नागपुरे, आशिष आकोटकर, नागपूर यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले.