दिव्यांगांनी मागे सरायचे नाही असा ठराव मंजूर करण्यात आला
नागपूर समाचार : दि ८-९-२०२२ ते ११-९-२०२८ बनारस येथे झालेल्या संमेलनात “प्रोग्रेसिव फेडरेशन ऑफ द विज्युअली चेलेंन्ज” संघटनेचे सहीत महाराष्ट्रातील ४९ प्रतिनिधी सहभागी झाले होते. या राष्ट्रीय संमेलनात नवीन शिक्षण धोरण शासनाची पूर्नवसनाची भूमीका ग्रामपंचायत रा पार्लमेंट पर्यंत प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी (आरक्षण) देशभरातील दिव्यांगणात जागृत करून प्रतिनिधीत्व मिळवण्यासाठी सरकारला आरक्षण देण्यास बाध्य करणे व आपला हक्क मिळवण्या शिवाय दिव्यांगांनी मागे सरायचे नाही असा ठराव मंजूर करण्यात आला.
नागपुरातील सुप्रसिद्ध दिव्यांग ॲडोकेट नंदिता त्रिपाठी हायकोर्टे अभिव्यक्ता यांनी १९९५ पूर्नवसन २०१६ कायदा तयार करण्यात आला. या कायद्याबद्दल यांनी या संमेलनात माहिती दिली.
दि. १०-०९-२०२२ ला “प्रोग्रेसिव फेडरेशन ऑफ द विज्युअली चेलेंन्ज” या संघटनेने या संमेलनात काशी दर्शनातही दिव्यांगांना लाभ करून दिले. दि ११-०९-२०२२ ला कवि संमेलनाने सांगता झाली. या संमेलनात नागपूरचे प्रतिनिधी, महासचिव भालचंद्र उपाध्याय सर (दिल्ली), अध्यक्ष दिपचंदजी (दिल्ली), उपाध्यक्ष केतकी शाह (मुंबई), पश्चिम विभागातील कार्यकारीणी सुनंदा पुरी (नागपूर) व नागपूरचे इतर प्रतिनिधी बादल कापसे, अक्षय चौधरी, निकिता डोंगरे, निलकंठ डेकाटे, इंदू नंदनवार, समीर त्र्यंबक मोकासरे, मिनाक्षी बाराहाते, रघुवीर दुर्वी, ज्योती समुद्रवार, श्री. धनसांडे, श्री. मांडव सर, कपील कावळे, रघुवीर धुर्वे, कु. वैशाली पारे, झरीना मंडपे, भिमराव उके, भिमराव वाघ इत्यादी या कार्यक्रमाला उपस्थित होते.