- Breaking News, नागपुर समाचार

उमरेड समाचार : अंधश्रध्दा व व्यसनमुक्ती जनजागृती अभियान

अंधश्रध्दा व व्यसनमुक्ती जनजागृती अभियान

उमरेड समाचार : दि. ११/१०/२०२२ ला परमात्मा एक सेवक संघटना, उमरेड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उमरेड येथील नगर परिषदेच्या पंडीत दिनदयाल उपाध्याय नाट्य सभागृहामध्ये कोजागिरीचे औचित्य साधून अंधश्रध्दा व व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री. राजुभाऊ पारवे, नगर परिषद चे मुख्य अधिकारी मा.श्री. मंगेशजी खवले, नेटवर्क कॉम्पुटर एज्युकेशन चे संचालक मा. श्री. जगदिशजी वैद्य, युवा सेवक अमित लाडेकर व जितेंद्र गिरडकर कार्यक्रमाला उपस्थित होते.

सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वरजी ब्रम्हे व सर्व उपस्थित मान्यवरांनी मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेसमोर द्विप  प्रज्वलन करून माल्यार्पण केले. तर संस्थेचे संचालिका सौ. शिलाताई झिलपे व इतर सेविकांनी मातोश्री वाराणसी आई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. नंतर कुमारी मयुरी आस्कर व त्यांच्या संच यांनी मान्यवराचे स्वागतगीतांनी स्वागत केले. तर संस्थेतर्फे मा. राजुभाऊ पारवे, मा. मंगेशजी खवले व मा. जगदिशजी वैद्य यांचे शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून उपस्थित मान्यवरांच्या सत्कार करण्यात आले.

मा. राजुभाऊ पारवे यांनी समाजातील लोकांनी अंधश्रध्देतून व व्यवसानातून मुक्त होण्याकरीता परमात्मा एक हाच एक चांगला मार्ग आहे. जे काम शासनाकडून होवू शकले नाही. ते काम मानवधर्मातील संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी संपूर्ण भारतात केलेले आहे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून उमरेड संस्थेचे संपूर्ण कार्यकर्ते खेडोपाडी, गावोगावी जावून दुःखी, कष्टी नागरीकांना मार्गदर्शन करून त्यांचे जीवन आनंदी व सुखमय करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री. हरिचंद्र गवळी यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मांगलगाव येथील चिमुकला सेवक क्रिश कानफाडे व कु. मयुरी आस्कर यांनी केले.

सदर कार्यक्रमाला उमरेड शहरातील व बाहेरगावून आलेले महानत्यागी बाबा जुमदेवजींचे सर्व सेवक, सेविका व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे शेवटी सामुहीक जयघोष करून महाप्रसाद व दुधाचे वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ब्रम्हे, उपाध्यक्ष वसंता वाघमारे, हरिचंद्र गवळी, चरनेश्वर अरेलकर, शंकर मोहीनकर, रामभाऊ राघोर्ते, भगवान रोहनकर, प्रभाकर शेंडे, प्रकाश कुडेगावे, वसंता मुनघाटे, चंद्रभान काटेखाये, दिलीप मुळे, दिलीप माकडे, एकनाथ कुरूटकर, उमेश गावतुरे, शुभम गवळी, विलास वाघमारे,

नितीन रोहनकर, गोवर्धन वैद्य, कवडू मुळे, नारायण फटींग, ईश्वर बेले, श्रावण वाघमारे, लोकेश गवळी, सचिन वाघमारे, प्रविण भुरसे, सागर गवळी प्रकाश देशमुख, संजय वाघमारे, रमेशराव कांबळी, पंकज कळंबे तसेच सौ. शिलाताई झिलपे, रेखा वाघमारे, नंदा देशमुख, ललिता अरेलकर, शकुंतला नरूले, दुर्गा आस्कर, मिना गवळी, कला कामडी, रश्मि मोटघरे, सुषमा गावतुरे, माही मोहीनकर यांनी व इतर सर्व सेवक-सेविका बालगोपालांनी कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडण्याकरीता मोलाचे सहकार्य केले.

(उमरेड से वासूदेव पोटभरे की रिपोर्ट) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *