विकासात्मक कार्याची माहिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावी – राजेंद्र जैन
गोंदिया समाचार : आज गोंदिया तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री वीरेंद्र जायस्वाल, यांच्या नेतृत्वात सौ.राजलक्ष्मी तुरकर, श्री कुंदन कटारे, श्री बालकृष्ण पटले, श्री केतन तुरकर, श्री गणेश बरडे, श्री रफिक खान यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांशी आगामी ग्रामपंचायत निवडणूक व अन्य विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून गोंदिया तालुक्यातील गांव निहाय्य आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या सारखे खंबीर नेतृत्व आपल्याकडे आहे. श्री पटेलजी यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी व्हावी यासाठी सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले. गोंदिया- बालाघाट, गोंदिया – बल्लारशाह रेल्वे मार्ग निर्माण करून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या प्रगतीला चालना मिळाली आहे.
शेतकऱ्यांच्या धानाला ७०० रुपये बोनस देण्यात आला. मागील वर्षी DBT च्या माध्यमातून धानाला बोनस मंजूर करण्यात आला ते बोनसचे मंजूर पैसे विद्यमान सरकारने अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले नाही. यावर्षी धानाला 1000/- रूपये बोनस देण्यात यावा. मागील वर्षीच्या बोनसचे पैसे DBT च्या माध्यमातून देण्यात यावे. प्रति एकरी 20 क्विंटल धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात यावी यासारख्या सर्वसामान्यांच्या हिताची मागणी श्री पटेल यांच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.
श्री जैन पुढे म्हणाले की, या उलट विकासाची गंगा घरोघरी आणू अशी घोषणा करणाऱ्यांनी यावर्षी शेतकरी संकटात सापडला असतांना सुध्दा बोनस व मागील वर्षीच्या बोनसचे पैसे DBT च्या माध्यमातून देऊ शकले नाही. महागाई व पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमती यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे यावर बोलायला तयार नाही.
खा.श्री प्रफुल पटेलजी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून श्री पटेल यांच्या माध्यमातून केलेल्या अनेक विकासात्मक कार्याची माहिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जन माणसापर्यंत पोहचवावी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
याप्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, वीरेंद्र जैस्वाल, राजलक्ष्मी तुरकर, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, घनश्याम मस्करे, गणेश बरडे, जगदीश बहेकार, रफिक खान, नीरज उपवंशी, अश्विनी पटले, मोहनलाल पटले, प्रदीप रोकडे, लीकेश चिखलोंडे, राजेश जमरे, शंकरलाल टेम्भरे, अशोक गौतम, बंटी पटले, मदन चिखलोंडे, चंदन गजभिये, नितीन टेभरें, सुनील पटले, टी. एम. पटले, डेव्हिड बरडे, राजू गौतम, राकेशसिंग जतपेले, हरगोविंद चौरसिया, नागरत्न बन्सोड, पकज चौधरी, मनोज बीजेवार, प्रदीप रोकडे, धनराज दोनोडे, रिताराम लिल्हारे, प्रभुलाल शेंडे, धर्मेंद्र गणवीर, सुरेश कावळे, अशोक ब्राह्म्णकर, गणेश फुंडे, चैनलाल दमाहे, राजू सतदेवे, ओमप्रकाश चौहान, सहेसराम उपवंशी, संजय चौहान, रामू चुटे,आरजू मेश्राम, गंगाराम कापसे, विजय वाघाळे, मंदिरं राऊत, भोजराज मेश्राम, विजयकुमार बिसेन, दीपक ठाकरे, धर्मराज कटरे, डालेश्वर रहिले, जितेंद्र बिसेन, दीपक पटले, रामेश्वर भगत, सुरेंद्र रिनाइत,विजय लिल्हारे, कपिल बावनथडे, कान्हा बघेले, राजेश नागपुरे, शेखर पटले, रितिक यादव, शुभम सयाम, राजू गायधने, राजू खरे, संतोष वाहाने, धनराज बनकर, कवेश्वर धुर्वे, लँकेश पटले, दादू मडावी, अमर सिंग नेताम, राजेश सानसरोदे, गोविंद लिचडे, हितेश पतहे, राजेश नागपुरे, हेमराज कामळे, भारत मेश्राम, गणेश दूधपाचे, भूपेंद्र राऊत, हाऊसिलाल साखरवाडे, द्वारकादास साठवणे, देवचंद लांजेवार, प्रितपाल येडे, दीपक साठवणे, योगराज गौतम, जगदीश ठाकरे, पप्पू रामटेके, के. जी. लांजेवार, अक्षय डोंगरे, सुरेश डोंगरे, गौरव शेंडे, तुषार उके, गुलाब गडपायले, हेमंत भाऊ, मधू वाघाडे, जगदीश चौधरी, गरेशलाल बिसेन, शिवप्रशाद डहारे, विनोद मेश्राम, कालू चौहान, कैलास काळबांधे, दुलीचंद पटले, सुरेश चुटे, अशोक चुटे, आशिष बन्सोड, राकेश चुटे, सुरेंद्र मेश्राम, गुणवंत मेश्राम, होलीराम कांबळे, इंदुराज शिवणकर, संजू कावळे, मारोती डोये, दीनदयाल भाऊ, विक्रमसिंग मानकर, शक्तिकुमार कटरे, कृष्णकुमार ठकरेले, विजय रहांगडाले, प्रदीप बावनकर, वैभव मस्करे, विकास गेडाम, संजू कटरे, रामू मानकर, नरहरप्रशाद मस्करे, पिंटू तिजारे, मोनू उके, डी. परिहार, प्रवीण नागपुरे, मोरेश्वर नागपुरे, तेजराम, नागपुरे, युधिष्ठिर पटले, रवी मुलतानी, पिंटू बनकर, संजय टेम्भूर्णीकर, श्यामकिशोर लांजेवार, रामेश्वर चौरागडे, मुनेश्वर कावळे, योगेश पतहे, विट्टल पारधी, फुलीचंद पटले, नूतनलाल बीजेवार, इंद्रराज शिवणकर, राजू गजभिये, संतोष चौरे, ऋषिपाल कावळे, दिलीप ठाकरे, विनोद नेवारे, दुलीचंद पटले, विनोद भाऊ, कुणाल बावनथडे, वामन गेडाम सहित गोंदिया तालुका पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.