सीसीआरटीच्या अध्यक्षपदी डॉ. विनोद इंदुरकर
नागपूर समाचार : ललित कलांचे टागोर प्राध्यापक आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ललित कला विभागाचे माजी प्रमुख डॉ. विनोद इंदुरकर यांची सांस्कृतिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र (सीसीआरटी), नवी दिल्लीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
शिक्षणाला संस्कृतीशी जोडण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्थांपैकी सीसीआरटी ही एक संस्था आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत ही स्वायत्त संस्था म्हणून कार्य करते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी भारतीय कला आणि संस्कृतीवर सैद्धांतिक आणि संकल्पनेवर आधारित शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणे व कला आणि संस्कृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सीसीआरटी फेलोशिप योजना राबवते.
कला व संस्कृतीशी संबंधित विविध संस्थांवर ते विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर २७ संशोधकांनी आचार्य ही पदवी प्राप्त केली असून ते ललित कलेतील एकमेव डी. लिट. प्राप्त प्राध्यापक आहे.