धर्मवीर डॉ. मुंजे यांची मैत्री परिवारतर्फे जयंती साजरी
नागपूर समाचार : भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, समाज सुधारक व निष्णात नेत्रविशारद धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांची मैत्री परिवार संस्थेतर्फे जयंती साजरी करण्यात आली. मुंजे चौक बर्डी येथील डॉ. मुंजे यांच्या पुतळ्याला मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी मैत्री परिवार संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. विजय शहाकार, सचिव प्रा. प्रमोद पेंडके, नितीन पटवर्धन, रोहित हिमते, प्रकाश रथकंठीवार, प्रवीण पंडे, चंद्रहास मुळे, सुनील अलोणी, बंडू भगत, देवेंद्र देवगडे, हेमंत बारस्कर, सुभाष वडोदकर, समीर वझलवार, स्वरुपा वझलवार, विजय जथे, दिलीप ठाकरे यांची उपस्थिती होती.