मैत्री परिवारच्या विद्यार्थ्यांचे सुयश
नागपुर समाचार : विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा नागपूर व सौ. सुमतीबाई पांडुरंग देव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्तवतीने “मै विवेकानंद बोल रहां हुं” संदेश पठण स्पर्धा घेण्यात आली. यात मैत्री परिवार संस्थेंतर्गत चालणा-या विद्यार्थी उन्नती ग्रृहातील एकुण ४४ मुलांनी सहभाग घेतला. यातील विविध गटात मोहित चौधरी, यश मोगरे, प्रणय अगुवार, साजन हलामी व प्रज्वल अगुवार यांनी पारितोषिके पटकावली.
नवयुग विद्यालय, महाल येथे पार पडलेल्या बक्षिस वितरण सोहळ्याला मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, दिलीप ठाकरे, रोहित हिमते, बंडु भगत यांची उपस्थिती होती. प्रा. माधुरी यावलकर व प्रा. अनिल यावलकर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले.