विरोधकांना बोलण्याची संधी टाळणे लोकशाहीच्या विरोधात
नागपूर समाचार : मी गेले ३२-३३ वर्ष विधानसभेत असताना माझ्याकडून अपशब्द कोणालाही वापरला गेला नाही. निर्लज्जपणा सारखे वागू नका. याचा अर्थ असा आहे की, सत्तारुढ पक्षाबरोबर विरोधी पक्षाला ही बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. ही माझी भूमिका होती, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर मांडली.
याचा अर्थ मी अपशब्द वापरला असा होत नाही. मी जे बोललो राज्य सरकारने टाळावे म्हणून बोललो. काही करून मुख्यमंत्र्यांचा भूखंडाचे प्रकरणावर चर्चा होऊ नये म्हणून यासाठी माझे बोलणे हे अध्यक्षांना बोलले गेले आहे, असे चिटकवून निलंबनाचा प्रस्ताव आणला व माझे निलंबन केले. माझा कोणाचाही अवमान करण्याचा उद्देश नव्हता. सभागृहात विरोधकांना बोलण्याची संधी टाळणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे, अशी भूमिका जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर मांडली.
अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षांना बोलून न देणे. आज तर कहर झाला जो विषय पटलावर नव्हता कोणतेही आयुध नसताना सत्ताधारी पक्षाचे नेते अचानक उभे राहतात. जे प्रकरण संपुष्टात आले आहे. त्यावर एकामागून एक १४ सदस्य बोलतात. सभागृह बरखास्त केले जाते. यावेळी केवळ सत्ताधाऱ्यांना बोलून दिले जाते विरोधकांना बोलू दिले गेले नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे बोलायला संधी मागतात. पण त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट हे सर्व वेल मध्ये येऊन अध्यक्षांना विनंती करू लागले की आम्हाला बोलण्याची संधी द्या. सरकार कसे कोडगे पणाने वागत आहे. ही भावना विधानसभेतील सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून व्यक्त होत होती. म्हणून मी आवाहन केले. मी माझ्या जागेवर बसून बोललो होतो. माझा माईक चालू नसताना बोललो होतो. तरी देखील आज सभागृहात निलंबनाचा ठराव मांडण्यात आला, असे जयंत पाटील म्हणाले.
विरोधी पक्ष सत्तारूढ पक्षाला अडचणी आणणारे प्रश्न विचारण्याची शक्यता असताना विरोधी पक्षाचे आवाज दाबण्याचे काम सतत सुरू आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्र्यांचा आविर्भाव पाहिला असेल तर मुख्यमंत्री कोणत्या प्रकारचे शब्द वापरू शकतात हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे, असे ही त्यांनी नमूद केले.