भक्तीगीत, भावगीत, लावणी, कोळी गीते, युगल गीत अश्या वैविध्यपूर्ण गीत प्रकारांची प्रस्तुती
नागपूर समाचार : शहरात पडलेल्या गुलाबी थंडीत जुन्या नव्या सदाबहार वैविध्यपूर्ण गीत प्रकारांच्या प्रस्तुतीने रसिक श्रोत्यांची मने जिंकली. ऋतुरंग संगीत विद्यालय प्रस्तुत ‘रसिका… तुझ्याचसाठी’ या सायंटिफीक सभागृहात आयोजित संगीतमय कार्यक्रमात जवळजवळ १५ गायिकांनी ‘इतनी शक्ती हमे देना’ या सुरेल समूह गीताने कार्यक्रमाची उत्तम सुरवात केली.
यावेळी प्रभा खांडेकर यांनी’ आगे भी जाने ना’, स्वाती नामजोशी यांनी’ आपकी नजरो ने समझा’, अनुराधा बापट यांनी ‘ ओ सजना ‘, हेमांगी खेडकर यांनी ‘रहे ना रहे हम’, वैशाली सांबरे यांनी ‘होले होले सजना’, स्मिता उदगिरकर यांनी’ निगाहे मिलाने को’, स्नेहल प्रतापे यांनी ‘नैनो मी बदरा छाये’, माधवी बांडे यांनी ‘पिया तोसे’, रंजना शर्मा यांनी “ये समा’, संगीता मदनकर यांनी ‘आखो से उतरी’, अपर्णा देशपांडे यांनी ‘बैया ना धरो’, ज्योती देशपांडे यांनी ‘बालमा खुली हवा में’, धनश्री जोशी यांनी’ रात का समा’ आणि अंजली केतकर यांनी’ पवन दिवानी’ अशी अप्रतिम भावगीते, प्रेम गीते गीते सादर करून राईकांची वाहवा मिळविली.
याशिवाय काहे तरसाये, हसता हुआ नूरानी, तुमको पिया, कजरा मोहब्बत वाला, जाने कहाँ , कोई आयेगा आणि सोना कहे झील्मील ही युगल गीते देखील सादर केलीत. तसेच ‘मी डोलकर’, ‘नाविक रे’ ही कोळी गीते कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. दिला विडा, नवी कोरी साडी, प्रीतीच्या दरबारी अश्या लावण्यांवर गायकांनी रसिकांना ठेका धरायला लावला. मिरचीचा तोरा, कांती नवंनवं तिची, झोकात सुटला वारा ह्या लावणी ढोलकी वर सोलो सादर केल्या. शेवटी सर्व गायक मंडळीने ‘ ने मजसी ने ‘ गौण भावपूर्ण निरोप घेतला.
या कार्यक्रमाचे उत्तम संगीत मार्गदर्शन गुणवंत घटवाई यांनी केले. यावेळी श्रीकांत पिसे, पंकज यादव, ऋग्वेद पांडे, अक्षय हरले, मुग्धा तपास यांनी साथसंगत केली तर आर्या घटवाई यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.