नागपुर समाचार : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.
ध्वजदिन निधी 2022 संकलनासाठी राज्य शासनाने नागपूर जिल्ह्यास 1 कोटी 91 लाख 98 हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. या राष्ट्रीय कार्यास जिल्ह्यातील सर्व विभाग, शासकीय तथा निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये, उद्योजक, सहकारी संस्था, बँका, शाळा, व्यापारी वर्गांनी जास्तीत जास्त निधी देत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संकलित झालेला निधी बँक, धनाकर्ष, धनादेश, रोख स्वरूपात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नागपूर यांच्या नावाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत क्रमांक १, तिसरा माळा, सिव्हिल लाईन्स, येथे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.