नागपुर समाचार : नागपूर 11 काष्ट्राइब महासंघ पुरस्कृत आणि 32 शिक्षक संघटना व 70 सामाजिक, राजकीय संघटनाचे समर्थन प्राप्त असलेल्या प्रा. ईजी. सुषमा भड यांनी नागपूर शिक्षक निवडणूकीसाठी आजअरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब महासंघ यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती विजयालक्षमी बिदरी विभागीय आयुक्त नागपूर यांना उमेदवारी अर्ज सादर केला.
शिक्षक निवडणूकीच्या इतिहासात कुठल्याच राजकीय अथवा शिक्षक संघटनेने महिलांना उमेदवारी दिली नाही, काष्ट्राइब महासंघाच्या पुढाकारने व शिक्षक संघटना व सामाजिक संघटनां द्वारा प्रथमच महिला उमेदवार म्हणून सुषमा भड याना उमेदवारी घोषित केली, सुषमा भड या उच्च शिक्षित असून ओबीसी चळवळीत झुंझार व रस्त्यावर लढणाऱ्या नेत्या म्हूणन प्रसिद्ध आहें.त्या काष्ट्राइब व ओबीसी महिला महासंघाच्या पदाधिकारी आहेत त्यांच्या उमेदवारीने महिलामध्ये उत्साह दिसून येत असून पारपरिक पक्ष व शिक्षक संघटनांचे धाबे दणानले आहेत. शिक्षक निवडणुकीत बहू चर्चीत असलेल्या सुषमा भड यांनी दुपारी विभागीय आयुक्त नागपूर यांना उमेदवारी अर्ज दाखल केला.
याप्रसंगी अरुण गाडे, रमेश बिजेकर, प्रा राहुल मुन, प्रा मधुकर उईके, अब्दुल पाशा, बलदेव आडे, संजय निंबाळकर, रमेश पाटील, ऍड समीक्षा गणेशें, मीना भागवतकर, रवि पोथारे, राजेश ढेंगरे, शामराव हाडके, प्रा एम एस वानखेडे, एम एस जांभुले, प्रा रमेश राठोड,सुगत रामटेके, अरुण साखरकर, प्रा नागसेन वानखेडे, सुषमा पेठेकर व इतर पदाधिकारी उपस्थितीत होते. विनीत – सीताराम राठोड, काष्ट्राइब महासंघ प्रती, मा. संपादक महोदय, कृपया प्रकाशनार्थ सादर