कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा अतिशय शिस्तबद्ध वातावरणात संपन्न
नागपुर समाचार : खासदार सांस्कृतिक महोत्सवासाठी बालकला अकादमी आयोजित तारे जमी पर या कार्यक्रमात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना आज दिनांक 12.1.2023 रोजी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम घेऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. रवींद्र फडणवीस , आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध समुपदेशक मा. श्री. राजा आकाश, बालकला अकादमीचे अध्यक्ष मा. मधुरा गडकरी, उपाध्यक्ष मा. रश्मी फडणवीस , सचिव मा. सुबोध आष्टीकर त्याचप्रमाणे बालकला अकादमीच्या सदस्या मा. सीमा फडणवीस, मा. शुभदा फडणवीस आणि महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. भागडीकर उपस्थित होत्या.
मा. श्री. राजा आकाश हे नागपूरचे सुप्रसिद्ध समुपदेशक त्यांनी मुलांशी हलक्या फुलक्या शब्दांमध्ये संवाद साधत सर्वांची मने जिंकली तर कार्यक्रमाचे अतिथी मा. श्री.रवींद्र फडणवीस यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालकला अकादमीचे अध्यक्ष मा. मधुरा गडकरी यांनी केले. खासदार सांस्कृतिक महोत्सवात केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी जवळजवळ 500 मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते आणि मधुरा गडकरींच्या प्रयत्नांनी आणि बालकला अकादमीच्या इतर सदस्यांनी त्या संधीचं सोनं केलं. या कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा अतिशय शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्वशी डावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पल्लवी देशमुख यांनी केले.