नागपुर समाचार : प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ व्हिजीवली चॅलेंज या संस्थेच्या वतीने चंडीकानगर २ मानेवाडा येथे हनुमान मंदीराच्या प्रांगणात दिव्यांग महिला, सपंग महिला विधवा आणि घटस्फोटील महीला यांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लुईस ब्रेक व डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संघाच्या राष्ट्रीय सदस्या सुनंदा पुरी यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी संघाची भविष्यातील वाटचाल व दिव्यांग बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व महिलांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहू असे प्रास्तावितून म्हटले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे सुलोचना वडस्करमी माझ्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच व्यासपीठावर बसले आणि प्रथमच माईक हातात घेतला आहे. आपण जो विधवा, दिव्यांग महिला यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतल्यामुळे समाजात १ जनजागृती होईल. आणि नवीन रूढी परंपरा चालू होतील. प्रत्येक महिलेला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि तो कोणीच हिरावू शकत नाही. असं त्या आपल्या भाषणातून म्हणाल्या.
दुसऱ्या अतिथी सुर्वणा बारेकर, अंधांचे जनक व ब्रेक लिपी चे संशोधक लुईस ब्रेल यांचा जीवनावर प्रकाश टाकला. आणि आपल्या कणखर आवाजात भाषण दिले. त्या म्हणाल्या आज दृष्टीबाधीत व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचले, ही सर्व कृपा लुईस ब्रेल चीच असं त्या म्हणाल्या दुसऱ्या विशेष पाहुण्या छाया गिरी मॅडम आपल्या दमदार आवाजात आणि आपल्या कुशल शैलीत आपल्या भाषणांने संपूर्ण महिलांचे मन जिकले.
दिव्यांगांच्या वेगवेगळे उदाहरण देऊन दिव्यांगांना प्रोत्साहित केले दिव्यांग महिल ऐवरेस्ट शिखर उसे चढू शकते याचे ज्वलंत उदाहरण त्यांनी दिले. आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. रोशनी देशकर यांच पत्नी कोरोणात वारले त्यांनी त्यांचा थरारक असा अनुभव सांगितल आणि सर्व महिलांच्या डोळ्यात अन आनावर झाले. माझ्यावर जो प्रसंग आला तो कोणत्याही महिलेवर येवू नये आणि अश्या कठीण प्रसंगी कोणीही धावून येत नाही असं माझं अनुभव आहे. असं त्या म्हणाल्या आज तुम्ही मला सन्मानित केले त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानते.
प्रणाली पुरी म्हणाल्या अशे कार्यक्रम होत राही ही काळाची गरज आहे. आणि परिवर्तनाची सुरुवात आपण स्वत:पासून करायला हवी. प्रत्येक स्त्रीने सन्मानाने जीवन जगण्यात ती सक्षम राहाते. तिला सहकार्याची गरज आहे. प्रणाली मोकासरे म्हणाल्या त्यांच्या प्रतिच्या व भावाच्या निधनाची त्यावेळी या तो वृतांत सांगितला प्रेक्षकांचे मण हेलावून गेले अशा प्रसंगांना सहकार्य न करता बोक बघायचीच भूमीका घेतात. आपण महिलांनीच सक्षम व्हावं व प्रसन्न राहावं, मॅडम नंदीता त्रिपाठींनी दिव्यांगांच्या कायद्याबद्दल माहिती दिली.
संघटनेचे अध्यक्ष श्री त्र्यंबक मोकासरे यांनी कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन मिनाक्षी बाराहाते यांनी केले. त्यानंतर हल्दी कुंकवाचा कार्यक्रम आटपून सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला.