नागपुर समाचार : ह्यूमेन फाॅउन्डेशन नागपूर ही शासनमान्य संस्था असून या संस्थेच्या अंतर्गत बंधु महागठबंधन, महाबोधी वधुवर सुचक, ओन्ली मॅरेज ग्रुप, संघर्ष मॅरेज ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने बौध्द समाजातील वधु-वर परिचय मेळावा रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने गुगल मीट ऍप वर घेण्याचे आयोजित केले आहे.
या ऑनलाइन मेळाव्यात ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी प्रथम bit.ly/bandhumarriage ही लिंक उघडून मोफत रजिस्ट्रेशन करुन ग्रुप मध्ये जाॅईन व्हायचे आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांनाच ऑनलाईन गुगल मीट वर वधु-वर परिचय मेळाव्यात भाग घेता येईल असे संस्थेचे अध्यक्ष पियुष वासनिक, बंधु महागठबंधन चे ऍडमिन विजय मांडवे, महाबोधी वधु-वर सूचक ग्रुप चे ऍडमिन जी पी वाघमारे, ओन्ली मॅरेज ग्रुप चे विशाल कांबळे आणि पवन बनसोडे यांनी कळविले आहे.
Helpline No. 8983022467, 9021339141