वैज्ञानिक सत्रांचे देखील यशस्वी आयोजन
नागपूर समाचार : इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचा एक भाग म्हणून एचआर कॉन्क्लेव्हचा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना नामांकित फार्मा कंपन्यांमधील दिग्गजांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या मेगा इव्हेंटमध्ये विविध पॅनल चर्चा, चर्चा सत्र आणि वक्ते यांचा समावेश होता. हा उपक्रम विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आणि भविष्यासाठी तयार करण्यासाठी घेण्यात आला जेणेकरून ते उद्योगाच्या गरजा अखंडपणे पूर्ण करू शकतील, असे फार्मा एचआर कॉन्क्लेव्ह समन्वयक, डॉ रश्मी त्रिवेदी यांनी सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पस, अमरावती रोड नागपूर येथे आयोजित ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस मध्ये आयोजित या अनोख्या एचआर कॉन्क्लेव्ह प्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी झालेल्या पॅनेल चर्चेसाठी थीम होती “पोस्ट-पँडेमिक फार्मा इंडस्ट्रीमध्ये टॅलेंट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस पुनर्परिभाषित करणे ; “आम्ही कॉर्पोरेट जगामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असताना संस्कृती आणि वैविध्य या बद्दलचे उपक्रम समजून घेण्याचे महत्त्व”. “द ग्रेट स्किल शिफ्ट” या थीमवर विविध वक्त्यांनी एचआर प्लेनरी सत्रात विचार मांडले. फार्मा उद्योग क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जसे की श्री राजर्षी गांगुली, अध्यक्ष ग्लोबल एचआर हेड, अल्केम लॅबोरेटरीज, सुश्री अर्नाबी मर्जीत, व्हीपी एचआर लुपिन, डॉ. सुनील सिंग, संस्थापक आणि सीईओ, माइंडस्ट्रीम, श्री राहुल मैत्रा, एचआर प्रमुख, अम्नील फार्मा, सुश्री शबनम गायतोंडे, व्हीपी एचआर, ग्रंथी फार्मा, श्री. सुहास राम, हेड एल अँड डी, अरबिंदो फार्मा, श्री सचिन गौर, ग्लोबल हेड, एल अँड डी, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, श्री अरविंद कुमार, केंद्र प्रमुख, टीसीएस, श्री. भूषण घोल्लर, सहसंचालक, एचआर, पार फॉर्म्युलेशन, सुश्री मेहक एम, हेड एचआर, ओलम, श्री पवन श्रीवास्तव, हेड एचआर, बीडीआर फार्मा आणि श्री. अभिनव श्रीवास्तव, हेड एचआर, जेसन्स इंडस्ट्रीज यांनी चर्चेत भाग घेतला. या कॉन्क्लेव्हला देशभरातील 500 हून अधिक विद्यार्थी तसेच विविध फार्मसी व्यावसायिकांनी हजेरी लावली.
वैज्ञानिक सत्रांचे आयोजन…..
३० वैज्ञानिक सत्रांमध्ये २००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ज्ञानार्जन केले. डॉ. रूप के खार, निमंत्रक, एसएससी , आयपीसीए यांच्यासोबत सक्रिय सायंटिफिक टीम मधील; डॉ.दादासाहेब कोकरे, अध्यक्ष, एलएससीए; डॉ.ब्रिजेश ताकसांडे आणि आयपीसीए वैज्ञानिक समितीचे सदस्य यांनी वैज्ञानिक सत्रांचे समन्वयन केले. बौद्धिक संपन्नता वाढविणारे सर्व सत्र यशस्वी ठरले.